गुरुवर्य कदम सर यांचे वय 47 वर्ष होते, त्यांनी आपल्या जीवनामध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात सुमारे 27 वर्षांची मुलांना शिक्षण देण्याची सेवा केलेली आहे, त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी चांगले घडलेले असून, ते मूळचे नगर जिल्ह्यातील वाडेगव्हाण या गावचे रहिवासी होते, अत्यंत गरीब, गोड, मनमिळाऊ स्वभावाचे असणारे कदम सरांची आठवण त्यांच्या जवळ असणाऱ्या सर्व मित्रमंडळींना, विद्यार्थ्यांना येत आहे, गुरुवर्य कदम सरांच्या आठवणीने आज प्रत्येकाच्या डोळ्यांना अश्रू येत आहेत, आज रविवारचा सुट्टीचा दिवस म्हणून कदम सर आपल्या गावी वाडेगव्हाण ला जात असताना आज रविवार सकाळी पुणे नगर महामार्गावर कारेगाव येथे त्यांची दुचाकी शाईन गाडी आणि ट्रॅक्टर यामध्ये झालेले अपघातात त्यांच्यावर काळाने घाला घातला, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटल शिरूर येथे पाठवण्यात आला असून, त्यांच्या जाण्याने शिरूर तालुक्यातील शिक्षकांमध्ये तसेच वढू बुद्रुक, वाडेगव्हाण गावामध्ये शोककळा पसरली आहे, त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई असा परिवार आहे,

