आम्हाला पुण्याहुन ५० किलोमिटर कारने यायला नको वाटते आणि हा कात्रजहुन ७० किलोमिटर उन्हात सायकलवर आलाय ? माजी सैनिक कॅप्टन उतम चौधरीचे पुजेला सायकल वरून आलेल्या या भावकीतिल तिसीच्या तरुणाची शौर्यगाथा ऐकून डॉ. शहाजी शितोळे या सायकलपटटूसह सारे आप्तेष्ट अवाक होऊन ऐकत होते . कन्याकुमारी ते जम्मूकाश्मीर हा ३८०० किलोमिटरचा प्रवास या संपतने १५ दिवसात केला आहे . तो नोकरीस असलेल्या खेड शिवापुरचा १५ किलोमीटरचा घाट चढून तो रोज कंपनीत सायकलवरच कामावर ड्युटीस जातो . पंढरपुर, शिर्डी, तुळजापुर ला लोक गाड्या करून जातात, पण हा सायकलवर देव देव करतो . मावळ अथेलेटस् असोशियन हा ५०० राईडर्सचा त्यांचा ग्रुप असून ते शाळांनी कँप घेऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सायकल वाटपही करत असतात . ते प्रवासासाठी सुरुवातीला साधी सायकल वापरत पण जसा देशभरचा प्रवास आरंभला तेंव्हा त्यांनी दिड लाख रुपयाची ही कॅनडल कंपनीची सायकल घेतली . इतकी महागाची परवडते का विचारता तेवढ्या रकमेचे पेट्रोल तर ६ महिन्याला स्कूटरला लागते तर मग महाग कशी ? पुर्ण फायद्यात आहे . आणि दुसरा खरा फायदा म्हणजे नियमीत सायकल चालवण्यामुळे शारीरीक व्यायामात ब्लड सर्क्युलेशन होऊन माणसाला बीपी शुगर आदी बिमारी कधीच होणार नाही . अन्यथा अलिकडे साधे अर्धा एक किलोमिटरवर बाजारात व शाळेत जायला कुणी गाडीशिवाय जायला मागत नाही व सुखासीन बैठी सवय लागत स्थुलपणा चरबी कोलेस्ट्रालने शरीर व्यापते व हालवत नाही . परीणामे खाण्यावर बंधने येतात . आर्थिक तोट्यापेक्षा हा शारीरीक बदल जास्त हानीकारक असून लहान मुलांनी मोटार गाड्यांची हाव न धरता प्रकृती स्वास्थ्यासाठी सायकलच वापरावी असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला . सायकल वापराने एकतर प्रदूषणास आळा बसेल व दुसरे आजारपणाचा खर्च वाचुन शरीरस्वास्थ्य लाभेल, निरोगी तंदुरुस्त जिवन जगायचे असेल तर तरुणाईने सायकल वापरावी असा सल्लाही संपत चौधरी या सायकल पट्टूने दिला .

