March 30, 2026
वाडेबोल्हाईतील वाडेगाव जि.प.केंद्र शाळेसमोर चिखलाचे साम्राज्य विद्यार्थ्यांना हानी होण्याची शक्यता ?आरोग्य धोक्यात
सुनील भंडारे पाटील
                    श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथे वाडेगाव गावठाण हद्दीत असलेल्या वाडेगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेची सुरुवात व विद्यार्थ्यांचे स्वागत या शाळेसमोर साचलेल्या चिखलाने केले.शाळेमध्ये प्रवेश करतानाचे चिखलातून विद्यार्थ्यांना जावे लागले.
                 या जिल्हा परिषद केंद्र शाळेसमोरील व बालकांच्या अंगणवाडी समोर प्रांगणात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे.तर काही ठिकाणी गवतही पाण्यात तसेच आहे.त्यामुळे विद्यार्थी,विद्यार्थिनी येथे खेळताना चिखलात घसरून त्यांना हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या चिखलामुळे व गवतामुळे तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने शाळा परिसरात दुर्गंधी पसरून मच्छर,डासांचे प्रमाण वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर येरणीवर येत आहे.
त्यामुळे येथे शाळेसमोरील प्रांगणात मुरूम टाकून स्वच्छतेची गरज असून याठिकाणी साचत असलेले पावसाचे पाणी कायम स्वरुपी काढण्यासाठी दर्जेदार व्यवस्था करण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.
                      शाळा सुरू होण्याच्या अगोदर या शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबके तयार झाले होते परंतु येथील पाणी शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर सिमेंट नळ्या टाकून काढून देण्यात आले.परंतु पाणी कमी झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे.
 शाळा सुरू होण्याचे आधी शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.ते पाणी आम्ही शिक्षण समितीच्या माध्यांमातून काढून दिले आहे.तसेच येथे पूर्वी टाकलेला मुरूम खाली दबला असून माती वर आली असल्याचे चिखल होत आहे.परंतु दोन दिवसातच येथे मुरूम आणून टाकून पावसामुळे साचत असलेल्या पाणी काढण्याची कायमची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.चिखल झाल्याच्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना न जाण्याची सूचना दिली आहे.
संदिप गोसावी,मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,(वाडेगाव) वाडेबोल्हाई