सुनील भंडारे पाटील
सदर कार्यक्रमासाठी.किसनराव पलांडे अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय अरून आतार सहसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, माननीय डॉ. गणपतराव मोरे शिक्षण उपसंचालक लातूर, रामदास जगताप उपायुक्त पी एम आर डी ए पुणे, सौ सुनंदा वाखारे माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे, कौस्तुभ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, खोमणे साहेब मुख्य विश्वस्त देवसंस्थान जेजुरी.चंद्रकांत वारघडे अध्यक्ष माहिती सेवा समिती.जी के थोरात कार्याध्यक्ष शिक्षक लोकशाही आघाडी महाराष्ट्र राज्य, नंदकुमार सागर अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, चंद्रकांत पाटील चेअरमन सेकंडरी स्कूल एम्प्लॉयीज क्रे.सो .मुंबई, सुधाकर जगदाळे,वसंतराव ताकवले,तुकाराम बेनके,मारुती कदम,अशोकराव भंडारे,गुलाबराव गवळे,बबनराव उकिरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
किसनराव पलांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिक्षकांनी काळानुसार बदलले पाहिजे ,नवनवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे तसेच अरुण आत्तार यांनी मुलांना शिक्षणाबरोबरच खेळांकडे घेऊन चल असा महत्त्वाचा संदेश दिला . तर डॉ.गणपतराव मोरे यांनी सांगितले आमचा शिक्षक बांधव कोणतेही काम दिले तरी नाही म्हणत नाही प्रत्येक काम करण्यास तयार असतो. रामदास जगताप यांनी सुद्धा शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
