March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी 
     लोणी काळभोर (ता हवेली) महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांपैकी रामदारा हे, निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी जाणाऱ्या नवीन कॅनल वरील पुल धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे,      

निसर्गप्रेमी तसेच राम भक्त, लोणी काळभोर येथील रामदारा दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात शनिवार आणि रविवार हे रामदरा पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटक भाविक भक्तांमुळे आणखीनच गजबजलेले असते. वाढती लोकप्रियता पाहता यामध्ये डेव्हलपमेंट देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता मा. उपसभापती युगंधर (सनी) काळभोर  सरपंच, सदस्य- नागेश काळभोर लोणी काळभोर ग्रामपंचायत लोणी काळभोर रामदारा येथील नवीन कॅनॉल वरील पूल धोकादायक अवस्थेत आहे. असे निदर्शनात येत असल्याने पर्यटक, वाहने अधिक वाढल्याने कॅनॉल वरील पूल अधिक भक्कम करणे गरजेचे आहे यासाठी सदर पूल लवकरात लवकर मंजूर व्हावा.! यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. लवकरच या नवीन पुलाची निविदा प्रसिद्ध करून प्रत्यक्षात काम सुरू होईल असे सिंचन भवन चे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी आश्वासनं दिले आहे.