धर्मपीठ, शक्तिपीठ, बलिदान पीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर), श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) तसेच तालुका, जिल्हा, राज्य, आणि देशांमध्ये धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा फाल्गुन अमावस्येला बलिदान दिन करण्यात येतो, हा बलिदान दिन शासनाने “धर्मवीर दिन” म्हणून घोषित करावा त्याचप्रमाणे गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते , आज सकाळी 11:00 वाजता लाल महाल पुणे येथून मोर्चा निघून पुणे जिल्हा परिषद कार्यावर धडकला , एक दिवस धर्मासाठी या संकल्पनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदूनी एकत्र येऊन या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते,
स्वाभिमान राखण्यासाठी खरंच आज हिंदू एकत्र आल्यानंतर काय करू शकतो, हे ज्वलंत सत्य आजच्या मोर्चावरून सिद्ध झाले अक्षरशा पुणे शहरामध्ये हिंदू जनशक्तीचा महासागर लोटला होता, सर्वत्र भगवेमय वातावरण दिसत होते, लाल महाल पुणे येथून सुरू झालेला हा मोर्चा पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय वर धडकला, “जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय,” अशा अनेक घोषणांनी पुणे शहर दणाणून गेले, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले,


