March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
         पुणे येथील प्रसिद्ध इंजिनिअरींग कॉलेजच्या होस्टेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. धक्कादायक म्हणजे एक विद्यार्थिनी या प्रकारात सामिल असल्यामुळे खळबळ उडालेली आहे.या विद्यार्थिनीवर आणि तिचा मित्र विनीत सुराणा याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थीनीला रिस्टीकेट केले असल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे.

             पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हॉस्टेल मध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती तीचा मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. विद्यार्थीनींचे या व्हिडओचा दोघांनी गैरवापर केल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे. दोघांनी मिळून अनेक विद्यार्थीनींचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकले आहेत.

           या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिंनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती आहे. ⁠या प्रकरणी चौकशी सुरू केली असून पोलीसात तक्रार दिली असल्याचा खुलासा सीई ओपीने केला आहे. संबधीत विद्यार्थिनीला रिस्टीकेट केले असल्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यत या विद्यार्थीनीला निलंबीत करण्यात आल्याचेही म्हटलेल आहे.