तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील या अभ्यासक्रमांमुळे तळेगाव ढमढेरे व परिसरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना सायन्स शाखेतील पदवी आणि कला व वाणिज्य शाखे अंतर्गत दर्जेदार पदव्युत्तर शिक्षणाची सोय तळेगाव ढमढेरे येथेच होणार आहे. विद्यार्थी व पालक वर्गातून दर्जेदार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावेत अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले व त्यांचे सहकारी डॉ. पराग चौधरी, डॉ. पद्माकर गोरे , डॉ दत्तात्रय वाबळे, दत्तात्रय वडघुले व नामदेव भोईटे यांनी आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रांची आणि शासकीय पातळीवर सर्व कामांची पुर्तता केली. शासकीय मंजुरीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी विशेष प्रयत्न केले.
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती माधुरी मिसाळ यांनी शासन मान्यतेस विशेष सहाय्य केले. साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दर्जेदार शिक्षण दिले जाते तसेच नव-नवीन अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात असे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांनी सांगितले. दरम्यान नवीन अभ्यासक्रमास शासन मान्यता मिळविण्यास विशेष प्रयत्न केल्याबद्दल संस्थेचे संचालक महेश ढमढेरे यांचे संस्थेच्या सर्व संचालकांनी कौतुक केले. तसेच आमदार माधुरीताई मिसाळ यांनी याकामी केलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे विशेष आभार मानले.


