March 30, 2026
सासवड बापू मुळीक 
      सासवड ( ता. पुरंदर ) येथील नगरपालिके समोरील शिवतीर्थावर आज सकाळी सामुदायिक राष्ट्रगीत घेण्यात आले.   

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, नीता सुभागडे, माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी, रोटरीचे अध्यक्ष गुलाब गायकवाड, ऍड. नितीन जाधव, प्रदीप ताकवले, शिवाजी कोलते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, नगर पालिका, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय आदी ठिकाणी राष्ट्रगीत घेण्यात आले. शेतात, कापड दुकान, सराफ व्यावसायिक, दवाखाने आदी ठिकाणी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.