March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
                रस्त्यावर आता तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर मा, न्यायालयाने आता मोठा निर्णय घेतला आहे, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकाला आता तब्बल दहा हजार रुपये एवढा दंड मोजावा लागणार आहे, त्यामुळे आता दारू पिऊन गाडी चालवणे अंगलट येणार आहे, 

                शहर तसेच ग्रामीण भागामध्ये तळीरामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून नागरिक राजरोसपणे दिवसा तसे रात्रीचे दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, बऱ्याचदा या तळेरामांच्यामुळे लहान मोठे अपघात झालेले आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहेत, 

                 सद्यस्थितीत वयस्कर, मध्यम वयोगटाबरोबर, तरुणाई देखील व्यसनाधीन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे, दारू पिल्यानंतर स्वतःच्या शरीराबरोबर चालवत असलेल्या गाडीचा देखील ताबा सुटला जातो, दुचाकी, चार चाकी बरोबर इतर वाहनांचा वेग वाढल्याने अनेकदा लहान मोठे अपघात घडत आहेत, यामध्ये कित्येकांना आपले जीवदेखील गमवावे लागले आहेत, रस्त्यावरील बरेचसे अपघात तळीरामामुळे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, 
                   मोटार वाहन कायदा कलम 185 यामध्ये आता सुधारणा करण्यात आले असून पूर्वी ड्रंक अँड ड्राइव्हसाठी तळीरामांना दोन हजार रुपये दंड कसला आकारण्यात येत होता, आता यामध्ये सुधारणा करून तब्बल तळीरामांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे, त्यामुळे आता सावधान जर दारू पिऊन गाडी चालवत असाल तर मात्र अशा तळीरामांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसणार आहे, 
                 वाहतूक पोलिसांच्या तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत आहे असे लक्षात आल्यानंतर ” ब्रेथ एनालायझर ” या डिजिटल मशीन द्वारे परीक्षण केले जाते, मशीनच्या पाईप मध्ये फुक मारण्यास सांगितले जाते, त्यामध्ये आपला चेहऱ्याचा फोटो येतो, तसेच आपली सर्व माहिती भरून त्यामधून पावती काढली जाते, तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, तुमच्यावर संबंधित तालुका न्यायालय मध्ये रीतसर तक्रार दाखल होते, न्यायालयाच्या सूचनेनुसार हजर न झाल्यास वॉरंट प्रक्रियेनुसार तुम्हाला हजर केले जाते संबंधित खटला मिटवण्यासाठी आपल्याला दंडात्मक कार्य वाहीतून न्यायालयात आपल्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागतो, मोटार वाहन कायदा कलम 185 मध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे तळीरामण्णा आता चांगला झटका बसणार आहे,