सणसवाडी (ता शिरूर) येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे सणसवाडी सेवा केंद्र, शिरूर तालुका व पुणे जिल्हा सेवा समिती आयोजीत भव्य नामजागर व प्रवचन सोहळा शिवम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न नामजागर सोहळ्यात बोलताना नरेंद महाराजाचे ‘ अरे अरे माणसा , घडीचा ना भरोसा । तरी बेफीकीर कैसा -‘ या अभंगावर बोलताना सोदाहरण सांगीतले . ‘दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे, माजी सरपंच दता हरगुडे , सुरेश हरगुडे व भक्तगण भावीकांचे हस्ते नरेद्रामहाराजांचे प्रतिमा पुजन करून या सोहळ्यास शुभेच्छा देण्यात आल्या . मयुर गुरुजी यांचे हस्ते पुजापाठ करून आरती घेणेत आली . पुजेचे यजमान सणसवाडी सेवाकेंद्राचे अंकुश सितापुरे यांना देवून त्यांचे व इतरांचे हस्ते आरती घेणेत आली ‘ गण गण गणात गोते ‘ नामघोषात गोलाकार फेर धरून तासभर नामजागर करणेत आले .
सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे यांचे हस्ते पालखीचे पुजन करून सकाळी १0 ते १२ . नरेंद्र महाराजांचे पालखी रथाची मिरवणुक काढून शिवम हॉलमध्ये मयुर गुरुजी व मान्यवरांचे हस्ते पाद्यपुजन करणेत आले . नाम जागरानंतर नानीजधामचे व्यवस्थापक शैलेशजी काळे सर यांची दुपारी ३ते ४ प्रवचन सेवा झाली . महाप्रसादाने नामजागर सोहळ्याची सांगता झाली .


