March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
      खुन्याने वेबसिरीज पाहून कितीही डोकं वापरून खून पचवण्याचा प्रयत्न केला तरी ‘कानून के हात लंबे होते है ‘ या गोष्टीचा प्रत्यय या खुनाचा छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्वरीत तपास करून सिद्ध केले .   

  दिनांक 1 जून रोजी सकाळी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सणसवाडी (ता शिरूर) येथे पुणे नगर रोड लगत गवारे पेट्रोल पंपाजवळ ललवाणी यांचे प्लॉटिंग शेजारी अज्ञात व्यक्तीच्या जाळलेल्या अवस्थेतील प्रेताचा शिक्रापूर पोलिसांनी पंचनामा करून बॉडी उत्तरीय तपासणीसाठी ससून येथे पाठवली व अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 302 प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला . गुन्ह्याची गांभीर्यता लक्षात घेऊन कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी ,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला महत्त्वाच्या सूचना देऊन गुन्ह्याचे तपासाबाबत अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे नियंत्रणाखाली दोन तपास पथके तयार करून सदर गुन्ह्याचा तपास केला .यावेळी एकूण 230 सीसीटीव्ही कॅमेरे चंदननगर वडगाव शेरी पर्यंत चार दिवसात दिवस रात्र तपासून पाहिले असता या गुन्ह्यामध्ये वॅगनर कारचा सहभाग झाल्याचे निदर्शनास आले . हे वाहन वडगाव शेरी परिसरातील असून जॉय कसबे ,वडगाव शेरी हा मालक असल्याचे समजले. त्या अनुषंगाने चौकशी केली असता ही गाडी एम एच 12 सीके 3177 त्यांचा मुलगा अग्नेल कसबे घेऊन गेल्याचे कळले ,त्यामुळे अग्नेल कसबे, वय 23 (वडगाव शेरी पुणे ) याला ताब्यात घेऊन चौकशी करता सौं सॅन्ड्रा जॉन्सन लोबो वय 43 (आनंद पार्क वडगाव शेरी ) व एक विधी संघर्ष बालिका यांनी संगनमताने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले . मयत व्यक्तीचे नाव जॉन्सन कॅजिटन लोबो ( वय 49 वडगाव शेरी पुणे ) असे असल्याचे सांगितले .आरोपी अग्नेल कसबे याचे विधी संघर्ष बालिका  व मयत यांची मुलगी आहे त्यांच्या या अनैतिक संबंधाला आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांच्यात वाद होत होते त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने संगणमत करून 30 मे रोजी रात्रीचे वेळी त्यांचे घरातच डोक्यात वरवंटा मारून व चाकूने वार करून खुन करण्यात आला. त्यानंतर मयत प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रात्री वॅग्नर कार मध्ये घालून सणसवाडी जवळील पेट्रोल पंपाशेजारील चारीत टाकून त्यावर पेट्रोल ओतून जाळून टाकण्यात आले.तपास अधिकाऱ्यांनी छडा लावून आरोपींना पाच जून रोजी अटक केली .न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ग्रामीण पुणे चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश  शिळीमकर, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पी आय वैभव पवार ,नितीन अतकरे , गणेश जगदाळे ,महादेव शेलार , अभिजीत  सावंत, अमोल खटावकर , तुषार  पंधारे ,’ जितेंद्र पानसरे , जनार्दन मोकळके , राजू  मोमीन, योगेश नागरगोजे ‘ अमोल दांडगे ,श्रीमंत होनमाने , नाईक विकास पाटील ,शिवाजी चितारे , निखिल गवई ,किशोर शिवणकर , मुकुंद कदम या पथकाने गुन्हा उघडकीस आणला . पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर ,सचिन होळकर ,चंद्रकांत काळे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनीअधिक तपास करत खुनाला वाचा फोडत तात्काळ आरोपींना जेरबंद केल्याने या कामगिरीचे परीसरात कौतुक होत आहे.