महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मध्ये सणसवाडीतील ४७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले ,या निमित्ताने नवनाथ विश्वनाथ हरगुडे माजी उपसरपंच, सणसवाडी, चेअरमन प्रारंभ प्रॉपर्टीज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आमदार पवार यांचे वाढदिवसानिमित्त दरवर्षी गोर गरीब मुलांसाठी वह्यांचे वाटप केले जाते .यावर्षी देखील गोरगरीब मुलांना वयाचे वाटप करण्यात आले. परीक्षेत घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल उपशिक्षक भाऊसाहेबजी उचाळे सर, . संभाजी ठुबे, जोशना हरगुडे मॅडम, दहिफळे मॅडम, इनामदार मॅडम यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती मोनिकाताई हरगुडे , नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर ,मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, माजी सरपंच शिवाजीराजे दरेकर , सणसवाडीच्या सरपंच संगीताताई हरगुडे ,ग्रामपंचायत सदस्य राजू अण्णा दरेकर., विजय राज दरेकर., नवनाथ दरेकर ,दगडू नाना दरेकर ,सागर दरेकर ,माजी उपसरपंच राहुल दरेकर , महादेव हरगुडे , सामाजिक कार्यकर्ते रामदास दरेकर , सुभाष दरेकर , गोरख नाना भुजबळ ,हिरामण दरेकर , हरीशशेठ हरगुडे, बबन दरेकर , बापूसाहेब दरेकर ,संतोष दरेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर हरगुडे , उपाध्यक्ष अमोल दरेकर ,प्राध्यापक अनिल गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. वसेवाडी शाळेतील उपशिक्षक पडवळ सर व मुख्याध्यापक यांनी आभार व्यक्त केले.


