March 30, 2026

 हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

          जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे आजोळ  म्हणून प्रसिद्ध असलेल्या  श्री क्षेत्र लोहगाव येथील ज्या शिळेवर बसुन तुकाराम महाराज कायम स्नान करत तिथेआज शीळा  मंदिर झाले आहे त्या शीळा मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेवर स्थानिक रहिवाशांचे सर्व सांडपाणी जाऊन मंदिरासमोरच फार मोठी गटारगंगा निर्माण झाली आहे
                 

 ह्या घटनेचा तेथील स्थानिक नागरिकांना उपद्रव होत असून मलेरिया डेंगू यासारख्या मोठ्या आजारांना आपोआप निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी आमदार सुनील टिंगरे यांच्या विकास निधीतून बंदिस्त गटार योजनेसाठी निधी आला होता परंतु स्थानिक जागा मालकांनी त्याला विरोध दर्शविल्यामुळे ते काम अपूर्ण स्थितीमध्ये आहे 

              

               तरी आरोग्य विभागाने त्वरित या घटनेकडे लक्ष न दिल्यास एक महिन्यामध्ये हा विषय निकाली न निघाल्यास आरोग्य विभागासमोर फार मोठे ठिय्याआंदोलन शिवसेना शाखा लोहगाव शिळा मंदिर ट्रस्टव स्थानिक नागरिकांच्या वतीने उभारले जाईल असा इशारा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सोमनाथ उर्फ बाळासाहेब खांदवे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.


                      

                   याप्रसंगी शिव सहकार सेनेचे एकनाथ खांदवे उपविभाग प्रमुख संजय मोझे माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत खांदवे राजाराम मोझे गोविंदा मुरकुटे गुलाब खांदवे सचिन खांदवे ह भ प अशोक खांदवे बाळासाहेब खांदवे सोमनाथ खांदवे सोपान खांदवे व महिला कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,