पहाटे विद्याधर आगलावे यांनी श्रींची पूजा केली.चिंचवड देवस्थान च्या वतीने श्री चिंतामणीची महापुजा करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प श्री आनंद तांबे महाराज उपस्थित होते चिंचवड देवस्थान आणि आगलावे बंधू यांच्या वतीने मांडव घालण्यात आले होते आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती
देवस्थानच्या वतीने दर्शनबारीची सोय करण्यात आली होती मंदिराचे गाभारे व सभामंडपात फुलांची आरास करण्यात आली होती दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपासाची खिचडी वाटण्यात आली सायंकाळी ह.भ.प गंगाधर महाराज पाटिल यांचे किर्तन झाले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ग्रामपंचायतच्या वतीने पार्किंगची सोय करण्यात आली होती, सर्व व्यवस्थेवर विश्वस्त ह.भ.प आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून होते,



