श्रीनाथ म्हस्कोबा कवडीची प्रस्थान पिसे येथून ११ वाजता होऊन कावड १२ वाजता भुलेश्वर पायथा येथे पोचल्यानंतर आरती होऊन कावड अवघड स्थितीतून भक्त गणांनी पिसे-रिसे-खोपडेवाडी येथील युवकांनी कवडीला कोणताही डाग फटका न होता कावड सुरळीत वरती पोहचली ,याठिकाणी देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पिसे -माळशिरस -राजुरी-यवत-राहू-राजेवाडी या ठिकाणावरून आलेल्या कावडींनी महादेवाच्या मंदिराला पाण्याची धार घालण्यात आली.या निवडीसाठी सरपंच रोहन मुळीक,उद्योगपती संतोष मुळीक,पत्रकार बापू मुळीक,प्रकाश ज मुळीक,माजी सरपंच दीपक मुळीक,माजी उपसरपंच संदीप मुळीक,रमेश मुळीक,अध्यक्ष काँग्रेस कमिटी दौंड विठ्ठल दोरगे,गजानन मुळीक,बाळू गोसावी,जालिंदर आ मुळीक,गुलाब भैय्या सय्यद,विजय इंगळे,पिसे -रिसे-खोपडेवाडी येथील युवा नेतृत्वाने बहुसंख्येने कावडीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या असे उद्योगपती संतोष मुळीक यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

