March 30, 2026
सासवड : प्रतिनिधी :बापू मुळीक 
    आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली . त्यामुळे आज सर्वत्र उत्साहात , आनंदात आणि देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.   

 विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थी , शिक्षक व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून देशभावना , राष्ट्रभक्ती , देशप्रेम जागृत केले . राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्र सर्वोपरी , शिक्षण , पारदर्शकता , स्वच्छता या मंत्रांचा उपयोग.उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक होऊ त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ‘. 

        या सोहळ्यासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्या .सुषमा रासकर , सीबीएससी विभागाच्या प्राचार्या   .ज्योती क्षीरसागर ,.उज्वला जगताप ,.स्वाती जगताप ,पुरंदर शिक्षण शास्त्र विद्यालयाचे प्राचार्य बोराटे सर , विद्यालयाचे पालक प्रतिनिधी , एसएससी व सीबीएससी शाखांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका ढंढोरे यांनी केले.