याप्रसंगी मा.दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आपले भाषणामध्ये राजकीय उहापोह करताना बाजार समितीमध्ये सध्याचे संचालक मंडळाचे कालावधीत उल्लेखनीय काम झालेले असुन तोट्यात असणाऱ्या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करून नफ्यात आणण्याचे काम केलेबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी माजी आमदार पोपटरावजी गावडे, सुर्यकांतकाका पलांडे, पुणे जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, मानसिंग पाचुंदकर बाजार समिती संचालक व अध्यक्ष आंबेगांव विधानसभा राष्ट्रवादी कॉग्रेस, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, माजी उपसभापती सविताताई पऱ्हाड, बाजार समितीचे माजी संचालक वाल्मीकराव नागवडे, गौतम कदम, सिद्धार्थ कदम, महादेव जाधव, संतोष भंडारी, बच्चुपाटील जाधव, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल होळकर, सुदामतात्या साठे, अर्जुननाना कोंडे, आलेगांव पागाचे सरपंच आप्पासाहेब बेनके, टाकळी हाजीचे सरपंच दामुशेठ घोडे, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, प्रगतशिल शेतकरी सोपानराव भाकरे, सुरेश पाचर्णे, जगन्नाथ पाचर्णे, रामलिंगचे माजी सरपंच नामदेव जाधव, माजी सचिव पी.एन.ढोकले, विश्वासराव पवार, अनेक शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व बाजार घटक तसेच बाजार समितीचे सभापती ॲड.वसंतकाका कोरेकर, उपसभापती प्रा.सतिश कोळपे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकरदादा जांभळकर, माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, प्रविण चोरडीया, संचालक विजेंद्र गद्रे, सुदिप गुंदेचा, बंडु जाधव, छायाताई बेनके, मंदाकिनी पवार, सहाय्यक निबंधक शंकर कुंभार, सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.


