March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
         शिक्षक दिनाचे औचित्य साधून माहिती सेवा समितीचे माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बकोरी (तालुका हवेली) येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी वारघडे बोलत होते.  

  बकोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यातील एक आगळी वेगळी शाळा आहे इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत असलेल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आहे, त्यामुळे मुलांना शिकवणे सोपे जाते व ते लवकरच समजते अशी माहिती शालेयसमिती चे अध्यक्ष  बाळु ज्ञानेश्वर वारघडे यांनी दिली. शाळेतील सर्व सोई सुविधा उपलब्ध करण्यामध्ये यापूर्वीचे अध्यक्ष राजेश वारघडे व ज्ञानेश्वर वारघडे यांचा खुप मोठा वाटा असल्याचे बाळु वारघडे यांनी सांगितले.शाळेचा परीसर खुप सुंदर स्वच्छ व बोलका आहे, सुंदर झाडे, पाणी पिण्यासाठी फिल्टर प्लॅन्ट ,सुंदर, स्वच्छ किचन , अशाप्रकारे शाळा पाहण्यासारखी आहे असे तेथील मुख्याध्यापक सुनील गायकवाड यांनी सांगितले तसेच शाळेसाठी मुलांना मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मागणी अध्यक्ष बाळू वारघडे यांनी केली,सर्वं शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, उपस्थित शिक्षकांमध्ये  आंबवनेसर श्रीमती रोहोडकर,भोसले, धुमाळमॅडम, मसलखांबसर , कृष्णा गवळीसर हे शिक्षक उपस्थित होते़