March 30, 2026

प्रतिनिधी वैभव पवार

             महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर (ता शिरूर) भरारी न्यूज ने भेट दिली.तेव्हा या रुग्णालयाला जाणार रस्ता हा अजूनही व्यवस्थित नाही, अजूनही मुख्य रस्त्या पासून तळेगाव ढमढेरेकडे जातांनी डाव्या हाताला हा दगडी अरुंद रस्ता आहे, तात्काळ – अर्जंट पेशंट किंवा एखादी प्रसव वेदना असणारी महिला जर असेल तर तिला या यातना सहन कराव्याच लागणार किंवा रस्त्यातच तिची प्रसूती होऊ शकते अशी अवस्था या रस्त्याची आहे .

            या ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपचारासाठी, तपासणीसाठी येत असतात.रुग्णालय आहे, या रुग्णालयाला कंपाउंड वॉल पण आहे पण रस्ताच व्यवस्थित वाहतुकी लायक नाही.करोना काळ असेल किंवा त्याअगोदर पासून हा रस्ता असाच आहे. जवळ लोक वस्ती देखील आहे.नागरिकांना रस्त्या सारखी प्राथमिक सुविधाच जर उपलब्ध नसेल तर नागरिकांनी काय करायचे.सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ग्रामीण रुग्णालया कडे जाणारा रस्ता सुखकर व्हावा व सर्व सामान्य रुग्णांना नागरिकांना व आरोग्य विभागाला यातून सोडवावे.