March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
       श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती (तालुका शिरूर) देवस्थान ट्रस्ट च्या वतीने विनायक चतुर्थी उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.       

   शनिवार दि . २५ मार्च २०२३ रोजी  विनायकी चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, गणेश याग करण्यात आला व १२ वाजता महापूजा व महानैवेद्य मुख्य विश्वस्त  ओमकार नितीन देव यांच्या हस्ते करण्यात आला. विनायकी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध बैलगाडा मालक  आनंदराव दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात ५०१ शहाळे देवाला अर्पण करून श्री महागणपती चरणी आपली सेवा अर्पण केली. सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत असताना महागणपतीला केलेली शहाळ्यांची मनमोहन व आकर्षक सजावट भाविकांना आकर्षित करीत होती. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा  स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी

       यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ  अध्यक्षा  स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष  संदिप दौंडकर, सचिव  तुषार पाचुंदकर पाटील, मुख्यविश्वस्त  ओमकार देव ,
खजिनदार  विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताञय  पाचुंदकर पाटील, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.