March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
 
          वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याच्या
बाजूला भर लोकवस्तीत असलेल्या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यातील पाण्यात
केमिकल सोडले जात असून, हवेमध्ये  घातक धुराचे लोटची लोट सोडले जात आहेत,

पर्यावरण व प्रदूषण खात्याचे मात्र तक्रारी देऊन देखील दुर्लक्ष आहे,           

संबंधित कंपनीची पाहणी केली असता, अनेक चुका लपवण्यासाठी
कंपनीला नावाचा बोर्डच नाही, यावरून कंपनीच्या सगळ्या गोष्टी उघड होत आहे,
आपण फोटो व व्हिडिओमध्ये पाहू शकता 24 तास घातक केमिकल व मानवी आरोग्यासाठी
घातक असणारा धूर दिवसाढवळ्या राजरोसपणे पर्यावरणात मिसळला जात आहे,       

याचा
मानवी व जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे, संबंधित ठिकाणी आजूबाजूला
सुमारे 2500 लोकांची लोकवस्ती असून, धुरामुळे अन्न, पाण्यात कार्बन मिसळत
आहे,    

शिवाय दाट वस्ती असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामध्ये केमिकल सोडले जात
असून हेच पाणी पुढे जनावरांना पिण्यासाठी जात आहे,    

लोक वस्तीतील विहिरी,
बोर मधील पाणीदेखील प्रदूषित झाले आहे, आसपासच्या परिसरात केमिकल व धुराचा
खूपच उग्र वास आहे, परिणामतः शेती पिके धोक्यात आलेली आहेत,
तसेच या भागात
राहणाऱ्या ग्रामस्थांचे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,

या निनावे कंपनीच्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना अनेकदा
लेखी तक्रार देऊनही संबंधित खाते व अधिकारी कोणत्याच स्वरूपाची कारवाई करत
नाहीत, कारवाई न होण्याचे गुड आता लोकांना उलगडले आहे, कायदा नियम धाब्यावर
बसून संबंधित कंपनीचे व्यवस्थापन राजरोसपणे चुकीचे काम करत आहे, संबंधित
खात्याने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, अन्यथा
तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे,
कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,