March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
          वडू खुर्द (तालुका हवेली) येथे ग्रामस्थांच्या वतीने तीन ठिकाणी क्रांतिवीर उमाजी नाईक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,  

गावांमधील मुख्य गावठाण, ग्रामपंचायत कार्यालय, व माने वस्तीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी  जयंती साजरी करण्यात आली, यावेळी उपस्थितांनी उमाजी नाईक यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली, याप्रसंगी अनेकांनी मार्गदर्शन केले, उमाजी नाईक यांचा  इंग्रजांच्या काळातील जीवन प्रवास, व त्यांनी अस्तित्वासाठी केलेली लढाई याचा ज्वलंत इतिहास जणू अनेकांनी आपल्या मार्गदर्शनामधून मांडला ,

यावेळी सरपंच मोहिनीताई भोंडवे, उपसरपंच नवनाथ पवळे, माजी उपसरपंच सीमाताई भंडलकर, ग्रा, स,वंदना निवृत्ती दरेकर विलास तात्या खांडवे, सर्जेराव पवळे, सुरेश नाना चोंधे, रमेश भंडलकर, प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग विद्यार्थी, महेंद्र खांदवे, रामा भंडलकर, रोहित शिरतोडे, जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष किरण भंडलकर, दिलीप मलाव, आदी उपस्थित होते निवृत्ती दरेकर यांनी आभार मानले