लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सुचना वजा आदेश सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी पो उप नि धायगुडे, अंमलदार पो ह वा सातपुते, पो ना धनवटे व भोसले यांना दिले होते. त्यानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १) संजय नेहरु राठोड, वय ४५, काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे, २) विवेक बबलु यादव, वय ३६, रामदरा रोड, बल्लाळवसी, ता. हवेली, जि. पुणे, हे दोघे पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि त्यायोगे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत असले बाबत तसेच हातभट्टी गावठी दारु व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशी महिती मिळाली. सदर माहितीचे अनुशंगाने दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी सदर गुन्हेगारावर एम पीडीए कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संजय नेहरु राठोड यास अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे व विवेक बबलु यादव यास नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारित केले आहेत.

