गॅस टँकर मधून गॅस लिकीज होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लोणीकंद पोलिसांच्या वतीने केसनंद लोणीकंद रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन च्या साहाय्याने भारत गॅस कंपनीचा दुसरा टँकर बोलून त्यामध्ये गॅस शिफ्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले,घटना स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या, सदर रोडवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्यावर वळविण्यात आली होती त्यासाठी दहा चेक पॉईंट्स / पंक्चर पॉईंट्स वर अंमलदार नेमण्यात आले होते. रात्रीच अग्निशमन दल व भारत गॅस चे safety manager यांना घटनास्थळी बोलावले. घटनास्थळावरून high tension विद्युतवाहक तारा जात असल्याने MSEB संपर्क करून विद्युत प्रवाह बंद केला. सदर भागात घरे असणाऱ्या लोकांना आवश्यक त्या safety precautions दिलेल्या आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व त्यांचे इतर पोलीस सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आसपास जोडला जाणारा पलटी झालेल्या ग्यास टँकर पासून सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते बंद करण्यात आले, त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला, पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे,
