संबंधित रस्त्यावर रहदारी, औद्योगिक क्षेत्र, शेती क्षेत्र, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, पाहता सतत वर्दळ असते, हा महत्त्वाचा मार्ग जोडलेले धार्मिक स्थळ म्हणजे ञानेश्वर महाराज समाधी आळंदी, या मार्गावर मध्यंतरी असणारे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर ही महत्त्वाची समजली जाणारी धार्मिक स्थळे आहेत, संपूर्ण राज्यातून तसेच देशातून या ठिकाणी शंभू भक्त, तसेच वारकरी सांप्रदाय मधील वारकरी, ठीक ठिकाणच्या दिंड्या या मार्गावरून जात असतात अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मार्ग,
मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असल्याने ऊस तरकारी वाहतूक या रस्त्यावर सतत असते, तुळापूर आणि मरकळ ला जोडणाऱ्या इंद्रायणी नदी पुलावरील वाहतूक दुर्दशामुळे जड वाहनांसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे, आता या भागातील शेतमाल वाहतूक होणार कशी,
वारकऱ्यांना व शंभू भक्तांना दोन्हीही समाधी स्थळी जाण्यासाठी एकमेव हाच मार्ग असल्याने, अतिशय खडतर पद्धतीने प्रवास करावा लागतो, धार्मिक क्षेत्रात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असणाऱ्या दोन्ही समाधी ठिकाणी जाताना, असंख्य लोकांना प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांचा खूपच त्रास होत आहे, रस्त्याची दयनीय अवस्था संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली,







