जगाच्या पाठीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रिंट मीडिया अस्तित्वात आहे, त्यानंतर वृत्तवाहिन्या आणि आता सुधारित तंत्रज्ञान च्या माध्यमातून इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही टोकाला घडलेली घटना एका क्षणात आपल्याला समजते, समाजामध्ये घडणाऱ्या अनेक चुकीच्या घटना, अवैध व्यवसाय, काळाबाजार, सट्टा, गुंडगिरी, थांबवण्यासाठी पत्रकार आपल्या लेखणीमधून अनेक मुद्दे समाजासमोर मांडत असतो, सद्यस्थितीत पैसा कमावण्यासाठी विशेषता तरुण पिढी चुकीच्या मार्गाला वळलेली आहे, त्यामुळे स्पष्ट पत्रकारिता करताना अनेकदा पत्रकारांना धमकी दिली जाते, तसेच मारहाण केली जाते, कित्येक ठिकाणी तर पत्रकारांचा खून देखील करण्यात आला आहे, अशा घटना सर्रास घडत आहेत,
पत्रकार संरक्षणाबद्दल संघटनांची अनेक वर्षांची मागणी प्रलंबित आहे, निशुल्क काम करणाऱ्या पत्रकारांनी घर कसे चालवायचे, त्यांच्या मुलांचे भवितव्य काय, अशा अनेक अडचणींना सामोरे जात पत्रकार आपली भूमिका चोख बजावत आहे, पत्रकार अडचणीत सापडल्यावर त्याचे माध्यम देखील बाजू घेत नाही, सत्य बातमी प्रसारित करताना तयार झालेले विरोधकांची देखील संख्या वाढते, त्यामुळे दिवसेंदिवस पत्रकारितेमध्ये अडचणी वाढत चालल्या आहेत,


