March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
             तालुका, जिल्हा, तसेच राज्यामध्ये अनेक प्रकारच्या निवडणुका पार पडताना मतदानामध्ये विश्वास नसल्याने उमेदवारांकडून विजयी होण्यासाठी देवाला मात्र चांगलीच सत्वपरीक्षा द्यावा लागते, त्यासाठी वेगवेगळी उपाययोजना केली जाते,             

निवडणूक लढवून विजयी होण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर करून उमेदवाराला तारेवरच्या कसरतीसाठी उतरावे लागते, हरप्रकारे प्रयत्न करून मतदानाचा ओघ आपल्याकडे कसा वळवता येईल यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारांना चांगलाच कस लावावा लागतो, मग त्यामध्ये आपल्या हक्काचे असणारे मतदान फुटू नये, तसेच प्रतिस्पर्ध्याच्या वेगवेगळ्या अमीशांना बळी पडू नये यासाठी अखेर देवांना साकडे घातले जाते, त्यामध्ये श्री खंडोबाची भैरवनाथाची तळी भरणे, देवदेवरुषी च्या साह्याने थतारमतार करणे, वेगवेगळ्या ठिकाणी उतारे टाकणे या प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहेत, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अशा स्वरूपाच्या घटना दात घडत आहेत, गावामध्ये राळे फेकणे, उडीद फेकणे, पंचरस्त्यावर उतारे टाकणे, गुलाल, भंडार, बुक्का टाकणे असा प्रकार निदर्शनास येत आहे, एकंदरीत राजकारण सोपे राहिले नाही, जो उमेदवार साम दाम दंड भेद या सर्व ताकतीने रिंगणात उतरेल आणि शेवटी कोणत्या गोष्टीचा आधार घेईल त्याचा नेम नाही, त्यामुळे लबाडांच्या राजकारणात देवाला मात्र चांगलेच कोडे पडत आहे,