झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी आणि राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर यांची सुकन्या ची सौ का दिव्या उर्फ कोमल आणि आश्वी तालुका संगमनेर येथील शामराव रेणुदास यांचे चिरंजीव ओंकार यांच्या शुभविवाह नुकताच आळंदी देवाची येथील संत सेना महाराज मंगल कार्यालयामध्ये कुठलाही अतिरिक्त डामडौल न करता नियोजन बद्दल रित्या संपन्न झाला यानिमित्ताने माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मार्गदर्शनाने व हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट यांच्या संकल्पनेतून लक्ष्मीतरु या औषधी वनस्पती वृक्षांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले.
विवाह समारंभातील अतिरिक्त खर्चाला फाटा देत पर्यावरण वाढीला दिलेल्या महत्त्वामुळे या लग्न समारंभाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. याप्रसंगी शैक्षणिक, उद्योग,सामाजिक,धार्मिक, राजकीय, पर्यावरणवादी आणि पत्रकारिता क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊपस्थीतामध्ये आमदार अशोक पवार, धर्मराज बोत्रे अध्यक्ष-माहीती सेवा समिती शिरुर , दिपक नायक, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक अशोक घावटे संपादक राजेंद्र शिंदे आर्यन घावटे तसेच राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय लोखंडे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे, जिल्हा अध्यक्ष सुनील भंडारे पाटील, जिल्हा संघटक संभाजी चौधरी, संपर्कप्रमुख साहेबराव आव्हाळे, कार्याध्यक्ष शंकर पाबळे, हवेली तालुकाध्यक्ष पोपट मांजरे,
केसनंद गावचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, नितीन गावडे, दत्तात्रय हरगुडे, पांडुरंग हरगुडे, डी एल हरगुडे, राजाराम सातव, श्रीकांत पाटोळे, रणरागिनी अलका सोनवणे, शोभा हरगुडे, सीता जाधव, प्रहार संघटनेचे धर्मेंद्र सातव, सचिन सातव नामदेव समाजोंनती परिषदेचे पुणे शहराध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे खजिनदार विजय लचके सहसचिव राहुल सुपेकर, योगेश मांढरे सामाजिक कार्यकर्ते राजेश दरेकर, मुकुंद लोखंडे, गणेश पाटोळे, ऋषिकेश चव्हाण, धार्मिक क्षेत्रातील संजयकाका आठवले, ह.भ.प. बापूसाहेब कुटे, सखाराम महाराज हरगुडे, चंद्रकांत गळंगे, वसंतराव हरगुडे, ज्ञानेश्वर गावडे अनेक दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,