पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ८ सायंकाळी सहा ते आज दि. ९ पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुकाई देवीच्या मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील गाभाऱ्याचे ही कुलूप तोडले. गाभाऱ्यातील देवीचे एक किलो वजनाचे अंदाजे २९,००० रुपये किमतीचे मखर, एक किलो चांदीचा अंदाजे २९,००० रुपये किमतीचा सिंह, तसेच देवीच्या डोक्यावरील अर्धा किलो वजनाची सुमारे १५,००० रुपये किमतीची छत्री असा एकूण ७३,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.आज पहाटे फिर्यादी श्री हांडे देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता, त्यांना हा प्रकार समजला.त्यांनी ग्रामस्थांना बोलावून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर, जेजुरी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शना खाली सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे हे करीत आहेत.

