March 30, 2026

पुणे जिल्हा प्रतिनिधी

             दुष्काळ, नापिकी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून थकलेल्या एक हजार ३७० शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

                 राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात, अशी मागील काही वर्षांची स्थिती आहे.अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे.यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.