मागील दोन वर्ष कोरोना काळात याञा बंद असल्यामुळे चालू वर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात असे आवाहन तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी केले.
रविवार ते बुधवार पर्यंत पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांना गणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. भाद्रपद गणेशोत्सव यंदा २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथेनुसार भाद्रपद गणेश उत्सवात श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहीणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयाञा काढली जाणार असल्याचे विश्वस्त डॉक्टर संतोष दुंडे यांनी सांगितले. यात्राकाळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुविधा देण्यात आले आहेत या दरम्यान भाविकांना मंडप व्यवस्था , वाहनतळ , पिण्याच्या पाण्याची सुविधा , हिरकणी कक्ष आदी सुविधा देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ व पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे ग्रामस्थ व विश्वस्त मंडळ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये भाविकांसाठी आवश्यक त्या सूचना व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून रांजणगाव देवस्थानचे विश्वस्त यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.याप्रसंगी शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी डाँ. दामोदर मोरे , महावितरणचे सहाय्यक अभियंता डी.पी.पाचुंदकर , अग्निशमन अधिकारी पी. व्ही. गुंड , ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख , सरपंच सर्जेराव खेडकर , शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर-पाटील , पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील , दत्ताञय पाचुंदकर-पाटील , देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तोबा लांडे , बबनराव कुटे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अँड विजयराज दरेकर , प्राध्यापक नारायण पाचुंदकर , सचिव डॉक्टर संतोष दुंडे , व्यवस्थापक बाळासाहेब गो-हे , नामदेव पाचुंदकर-पाटील , हर्षल जाधव , आकाश बत्ते , आण्णा शेळके , बाळासाहेब संदीपस्त आदी उपस्थित होते.




