मान्यवरांना ओवाळून व स्वागत गिताने स्पर्धेला सुरुवात झाली . छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून दिप प्रज्वलन करणेत आले . प्रा . अनिल शिंदे यांनी समाजाचे शिक्षण क्षेत्राकडे लक्ष कमी असून कोरोनाकाळात लोकांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली शाळांसाठी नाही . तसे ग्रामस्थांचे शाळेला सहकार्य असलेने बरीचशी कामे होत आहेत , शाळेच्या कमानीसाठी भिमाशंकर कारखान्यातर्फे निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली , ती प्रदिप वळसे यांनी मान्य केली . यावेळी शरद दुर्गे, विश्वास कोहकडे , स्वातीताई पाचुंदकर , पै. सुभाष उमाप यांनीही विचार मांडले . मान्यवरांचे हस्ते प्रथम कुस्ती महाराष्ट्र केसरी रघूनाथ पवार यांचे सुपुत्र शिरूर हायस्कूलचे पवन पवार व मांडवगणचे अभिजीत फराटे व अथर्व चव्हाण व साहिल शिंदे यांची कुस्ती लावणेत आली . त्यानंतर ज्ञानेश्वरी खैरे या मुलीची विकास झेंडे या मुलीसी प्रेक्षणीय कुस्ती झाली . तालुक्यातील ३० हायस्कूलच्या ११० जणांची स्पर्धेत नाव नोंदणी झाली असून उद्या मुलीच्या कुस्त्या होणार आहेत . यावेळी खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविलेल्या शैला बंडोबा धुमाळ हिचा स्वाती पाचुंद कर यांचे हस्ते सत्कार करणेत आला .चव्हाण सरांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले . युवापिढीला बलशाली करणाऱ्या या कुस्ती स्पर्धा आयोजनाचे उपस्थीतांनी कौतुक केले .

