मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील आनंद विकास सोसायटीचे तज्ञ संचालकपदी बाळासो बाबुराव व दिलीप मिडगुले यांची एकमताने निवड झाल्याचे सचिव सुखदेव खर्डे मोहन तळोले यांनी जाहीर केले यावेळी विद्यमान अध्यक्ष अमोल मिडगुले, उपाध्यक्ष दत्ता शिवले, माजी अध्यक्ष आनंदा मिडगुले, विष्णू मिडगुले, संचालक काळूराम गाजरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवा मिडगुले, माजी सरपंच कैलासनाना मिडगुले, हरीभाउ मिडगुले , बाळू शिवराम मिडगुले उपस्थीत होते. विष्णू मिडगुले व ग्रामस्थांचे हस्ते फेटा बांधून सत्कार करणेत आला सरपंच वर्षा मिडगुले व वाडीच्या विकासाचे शिल्पकार सुनिलनाना मिडगुले यांनी त्यांना पुढील विकासकामास शुभेच्छा दिल्या अध्यक्ष अमोल मिडगुले यांनी आभार प्रदर्शन केले .

