March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी 
      शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील नुकत्याच विभक्त झालेल्या ग्रामपंचायतची निवडणूक शांततेत पार पडली. यामध्ये तरुणांना संधी मिळाली. या आनंदातच अजून एक भर पडली ती म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. हा उपक्रम नवनिर्वाचित सदस्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला.    

     १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर झेंडा, घर घर झेंडा हा शासनाचा उपक्रम चालू झाला . ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रत्येक घरी जाऊन तिरंगा झेंडा वाटप केला . तसेच ग्रामपंचायत कर्मचारी  संतोष कानडे यांनी झेंडा कसा लावायचा व कधी उतरून ठेवायचा याची माहिती सांगितली. यामुळे नवीन पिढी काय करू शकते याचे एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे .

     

  यामध्ये शिरूर तालुका शिवबा संघटना अध्यक्ष व ग्रामपंचायत विभाजनाचे शिल्पकार सोमनाथ रसिक भाकरे , निलम अनिल रसाळ ,अदिनाथ शिवाजी भाकरे, आनंदा विठ्ठल भाकरे, साधना राहुल गारुडकर ,पूजा दौलत पांढरकर हे नवनिर्वाचित सदस्य व  सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

           या मोहिमेस टाकळी हाजीचे माजी उपसरपंच मच्छिंद्र भाकरे, टाकळी हाजीचे माजी उपसरपंच नवनाथ रसाळ, माळवाडी सोसायटीचे चेअरमन दौलतराव भाकरे,  टाकळी हाजीचे माजी सदस्य दशरथ भाकरे, रामदास भाकरे साहेब,  प्रगतशील शेतकरी एकनाथ भाकरे, भजनी मंडळाचे अशोक महाराज कानडे, संदीप महाराज भाकरे, सिताराम महाराज भाकरे, रामदास रासकर, अनिल गारूडकर, दत्तात्रय पांढरकर, लहू भाकरे, संभाजी पांढरकर,विलास भाकरे, रमेश दत्तू भाकरे यांनी सहकार्य केले. ग्रामसेविका राणीताई साबळे यांनी मार्गदर्शन केले.