March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
         रविवार दि. २ रोजी शाळेला सुटी असताही १७०० एवढी मोठी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  वसेवाडी (सणसवाडी)शाळेत महात्मा गांधी व  लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.       

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालसभेचे उत्कृष्ट नियोजन इयत्ता ८वी  वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ज्ञानेश्वरी सागर हरगुडे व दिव्या पवळ हिने केले.इयत्ता पहिली ते आठवीतील बऱ्याच मुलांनी महात्मा गांधींच्या जिवन संग्रामाविषयी व जिवन कार्याची माहिती सांगितली. आर्यन गणेश दरेकर इयत्ता सहावी याने इंग्लीश मेडीयमच्या मुलालाही लाजवेल असे फाडफाड इंग्रजीत भाषण केले.        

त्यामुळे इंग्रजी येण्यासाठी लाखोंचा खर्च करून इंग्रजी शाळानी मुले पाठवणेची गरज नाही हे उमगले .सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर तुकाराम हरगुडे यांनी आभार प्रदर्शन करताना मुलांच्या अभ्यास पुर्ण भाषणांची प्रशंसा केली सणसवाडीतील नामांकीत वकील ॲड. गणेश दरेकर यांनी स्वतःचा मुलगा या मराठी शाळेत घातला पण काही ज्यांना इंग्लीशचा गंध नाही असे धनाड्य पालक मात्र इंग्रजी शाळेत पोरगं घातलं म्हणजे मोठं होईल या भ्रमात मराठीतल्या संस्कारांना मुकल्याचे जाणवते असी खंत व्यक्त केली .वंदेमातरम राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,