March 30, 2026
भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांचा 12 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
शिरूर आंबेगावाच्या माजी सैनिकांनी एकत्रित येऊन निर्णय घ्या उठण्याबसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ- दिलिप वळसे पाटील 
प्रतिनिधी सुनील पिंगळे 
         भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका या संस्थेच्या 12 वा वर्धापन दिन सोहळा व भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रेसर नेतृत्व आदरणीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती समारंभ सोहळा, वीर पत्नी सन्मान सोहळा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आज कान्हुर मेसाई ता..शिरुर याठिकाणी संपन्न झाला यासाठी शिरूर तालुक्यातील माजी सैनिक, ग्रामस्थ सहकुटुंब सहपरिवारसह उपस्थित होते,  

  भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका या संस्थेच्या 12 वा वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात स्वातंत्र्य गीतांना व मानवंदना देत  करण्यात आली सोहळाच्या निमित्ताने  अनेक सेवानिवृत्त माजी  सैनिक विचारवंतांनी उपस्थित माजी सैनिक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय असुन देश सेवेकरिता जिवाची पर्वा न करता वीरमरण पत्करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या प्रशासनाने समर्पित भावनेने सोडवल्यास त्यांच्या सेवेची संधी आपल्याला मिळून त्यांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येईल, तसेच हे काम झाले तर सर्वात मोठा सन्मान हा माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्द मधील असेल अशा भावना माजी गृहमंत्री मा. दिलिप वळसे पाटील यांनी आज वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केल्या.

    सिमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो सैनिकांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा या कठीण प्रसंगातून सैन्यदलाने देशाला बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्या करिता प्रशासनाने समर्पित भावनेने समस्या सोडल्यास सैनिकांच्या ऋणातून उताई होण्याची संधी आपल्याला मिळते आहे या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शिरूर तालुक्याचं महत्वपूर्ण योगदान आहे अनेक हुतात्मांनी केलेल्या आंदोलनाचा इथे आवर्जुन उल्लेख करावा लागेल. अशा अनेकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. अशा सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरून चालणार नाही. आज आपल्याला त्यांच्यामुळेच भयमुक्त वातावरणात विकास साधता येत आहे. अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांना अभिवादन करत 

सीमेवर लढणारा प्रत्येक सैनिकांच्या, कुटुंबांना विविध प्रश्नांसाठी सरकार दरबारी अनेकदा खेटे मारावे लागतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी  जिल्हास्तरावर सैनिक कल्याण अधिकारी विभाग आहे. त्या माध्यमातून सैनिकांच्या वेतनाचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे, वीर नारींच्या नोकरीबाबतचे प्रश्न सोडविणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित कार्यालयाकडेच राज्यसरकारचे पुरते दुर्लक्ष होत आहे यासाठी भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचं उल्लेखनीय कामगिरी केली आहे 
शिरूर तालुक्यातील  माजी सैनिक यांच्या सामूहिक प्रयत्नांच्या बळावर चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करून कोरोना सारख्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे याकाळात भक्कम तटबंदी माजी सैनिक यांनी गावागावाच्या परिसरात उभी केली  होती त्यामुळे कोरोनासारखं विषाणूजन्य आजार गावाच्या वेशीवर येऊन थांबला यासाठी माजी सैनिक यांचे योगदान मोठे आहे यावेळी उपस्थित माजी सैनिक यांच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिलिप वळसे पाटील माजी गृहमंत्री यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले त्यांनंतर विविध क्षेत्रात माजी सैनिक यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक सपत्नीक कार्यक्रमासाठी उपस्थित होते अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांचा 12 वा वर्धापन दिन सोहळा साजरा संपन्न झाला यावेळी माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कार्यकर्ते,माजी सैनिक वीर पिता पत्नी माता, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे 
सुत्रसंचलन के के सोकोरे  यांनी केले व सुरुची भोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली,