March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
               भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मध्ये सणसवाडी (तालुका शिरूर) येथील बाबासाहेब चंदरराव दरेकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली,

                  बाबासाहेब दरेकर हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अत्यंत संघर्ष करून सणसवाडी तसेच शिरूर हवेली तालुक्यामध्ये भाजप पक्षाच्या संघटन करण्यामध्ये त्यांचा सर्व ताकतीनिशी सहभाग आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली, निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयराव हरगुडे यांनी नुकतेच दिले.

                  या निवडीनंतर दरेकर यांनी सांगितले की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणार आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची पकड दणकट करणार आहे,