मी आपल्या सर्वांच्या हक्काचे असणाऱ्या भरारी न्यूज च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, मला पत्रकारिता क्षेत्रातील गेले 15 वर्षांचा अनुभव आहे, मला पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य, गरीब लोकांची सेवा करण्याची आवड आहे, शिवाय सत्यतेवर लिखाण करणे हा माझा स्वभाव तयार झाला आहे, कोणावर ही अन्याय झालेला मला सहन होत नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी आहे मला याचा खूप अभिमान आहे, त्यामुळे मी माझे गाव, माझे धर्मवीर शंभूराजे यांचे विषयीची सत्यता आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, आणि राजकारणाची मला किळस आहे, खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे, कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही विनंती आहे,


