March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
               पेरणे फाटा, डोंगरगाव (तालुका हवेली) येथे प्रसिद्ध मराठी-हिंदी चित्रपट कलाकार मिलिंद गुणाजी यांनी भेट दिली, यावेळी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले,      

तळागाळातील कार्यकर्त्यांचा तसेच घनिष्ठ मैत्री खातर मिलिंद गुणाजी यांनी पुणे जिल्ह्यातील, हवेली पूर्व पट्ट्यातील पेरणे फाटा आणि डोंगरगाव या ठिकाणी भेट दिल्याने, सर्वत्र चर्चा चालू आहे, डोंगरगाव येथील मयूर गायकवाड यांच्या मैत्री खातर मिलिंद गुणाजींनी खेड्यापाड्यातील या  गावांना भेट दिली, मिलिंद गुणाजी यांच्या या गुणाची सध्या या भागात जोरदार चर्चा चालू आहे, मिलिंद गुणाजी यांचे प्रथमता पेरणे फाटा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत, तसेच डीजे च्या आवाजामध्ये, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर त्यांनी  डोंगरगाव येथील मयूर गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, यावेळी मयूर गायकवाड यांचा असंख्य मित्रपरिवार उपस्थित होता,

           मिलिंद गुणाजी यांचे बापू बिरू वाटेगावकर, गोष्ट एका पैठणीची, शेगाव चा योगी गजानन, एक मराठा लाख मराठा, ठण ठण गोपाळ, तसेच हिंदी विरासत, फरेब, मिरांडा हाऊस, गॉड मदर, ब्रम्हांडनायक साईबाबा, इश्क कयामत, जुलमी, कहानी किस्मत की, धमकी, दो राहे, मंथन, शिवा, इन्स्पेक्टर किरण, ये मेरा इंडिया, त्रिशक्ती, एक ही भूल, असंभव, देव, हिट, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपली भूमिका साकारली आहे,