March 30, 2026

पेरणे-कोरेगाव भीमा नदीवरील बंधाऱ्याचा भाग गेला वाहून

लोखंडी ढापे न काढल्याने मोठे नुकसान;पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष
माजी सरपंच निलेश वाळके यांचा आंदोलनाचा इशारा

सुनील भंडारे पाटील

                  हवेली व शिरूर तालुक्यांना जोडणारा भीमा नदीवरील पेरणे- कोरेगाव भीमा नदीमधील प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे बांधाऱ्याचा पेरणे गावाकडील बराचसा कडेचा भाग वाहून गेल्याने शासनाचे व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
                   पावसाळा सुरुवातीच्या तोंडावर या बंधारा पुलावमधील लोखंडे ढापे काढण्यात येतात.परंतु या बंधाऱ्याचे ढापे जास्त पाऊस असून देखील काढण्यात आले नसल्याने नदीचे प्रवाहाचे पाणी या ढापे न काढल्याने पाण्याचा फुगवटा साचून हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने परिणात: पाण्याच्या अती दाबामुळे पेरणे गावच्या बाजूकडील बंधारा फुटून वाहून गेला.
        याकडे सबंधित पाटबंधारे खात्याच्या अधिकारी,कर्मचारी यांच्या हलगर्जी पणामुळे व दुर्लक्ष केल्याने सबंधित बंधार्‍याचे बांधकाम वाहून गेल्याने नुकसान झाले असून या बंधाऱ्यावरून शेतकरी वर्ग कोरेगाव भीमा – पेरणे या भागात ये जा करीत असतो परंतु सुदैवाने येथे जीवित हानी टळली.मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीस पाटबंधारे खात्याचे अधिकारी असणार असून या खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे ही स्थिती उद्भवली असून पाटबंधारे खात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पेरणे गावचे माजी सरपंच निलेश वाळके यांनी दिला आहे.
                 याप्रसंगी पाटबंधारे खात्याचे
 शाखा अधिकारी राजाराम आहेर,देखभाल कर्मचारी संजय थिटे, कालवा निरीक्षक आशा डाके यांनी येऊन वाहून गेलेल्या बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.याप्रसंगी पेरणे गावचे माजी सरपंच निलेश वाळके,अनिकेत वाळके,संतोष वाळके,नितीन मल्हाव,भानुदास मल्हाव,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
                  या बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्याने नदीचे पात्र उथळ झाल्याने नीच्छितच पाण्याचा साठा कमी होणार आहे नदी काठाचे मोठे शेती क्षेत्र,या भागातील ओद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा होत असून बंधारा फुटल्याने पुढील काळात मोठ्या पाण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.असे माहिती देताना पेरणे गावचे माजी सरपंच निलेश वाळके यांनी सांगितले.
या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी कायमचा चौकीदार नेमावा:ग्रामस्थांची मागणी
                         शिरूर व हवेली या दोन तालुक्याना जोडणारा महत्वाचं बंधारा समजला जातो.सद्यस्थितीत येथे चौकीदार नसल्याने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष् झाल्याने ही घटना घडली आहे.त्यामुळे याची देखभाल करण्यासाठी कायमचा चौकीदार नेमावा अशी मागणी पेरणे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच निलेश वाळके,शेतकरी अनिकेत वाळके यांनी केली आहे.]
उन्हाळा शेवट रोटेशन संपल्यानंतर जे सततचा पाऊस चालू झाला,७ जून पर्यंत लोखंडी ढापे काढण्याचे नियोजन असते.बंधाऱ्याची रुंदी कमी असल्याने आपल्याला मशीन नेहता येत नाही.ढापे काढायला वेळच मिळाला नाही.येथे बंधारा विभागाचा कर्मचारी कमी असून चौकीदार नाही.पुढे नेमण्यात येईल.दुरुस्तीचे काम थोडे झाले होते.पाण्यामुळे काम पुढे करता आले नाही.
राजाराम आहेर,शाखा अधिकारी,पाटबंधारे विभाग