यावेळी प. पू. प्राणलिंग महास्वामीजी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की
योगा का करावा ? योगाचे महत्व काय ? योगा केल्याने खरोखर शरीराला फायदा होतो का ? योगाने आपले आरोग्य खरोखर निरोगी राहते का ? योगा सर्वांना करता येऊ शकतो का ? असे अनेक प्रश्न ज्यांनी आज पर्यंत योगा केलाच नाही त्यांना पडत असतो. काहींना योगा करण्याची खरोखर इच्छा असते परंतु आपल्याला जमेल की नाही या भावनेतून ते कधी प्रयत्नच करत नाहीत. काहींना आपल्या वजनाची लाज वाटते तर काहींना आजारपण किंवा मानसिक ताण यामुळे योगा किंवा व्यायाम करावासा वाटत नाही. या सर्वांच्या प्रश्नांचे किंवा योगा बाबतीतील समस्यांचे समाधान आपल्याला योग करूनच मिळणार आहे. योगा हा अनेक शतकांपासून चालत आलेला पारंपारिक व्यायाम प्रकार आहे. योगा मधील काही सहज प्रकार जे आपण अत्यंत सहजपणे करू शकता असे प्रकार आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे मोठया प्रमाणात आहेत
आपल्या देशाची संस्कृती पाहता भारतीय संस्कृती ने जगाला खूप मोठी देणगी दिलेली जग त्याच्या अनुसरून करत आहे आहे पण आपल्याच देशातील लोकांना याचे महत्त्व समजले नाही हे दुर्दैव आहे. जगाने आपली संस्कृती स्वीकारली आहे हे पाहून फार फार आनंद होतो, अर्थातच हे फार पूर्वी व्हायला हवे होते पण उशिरा का होईना जगाने भारतीय संस्कृती आचरणात आणत आहेत तसेच आपली भारतीय जनतेला याचे भांन आले, आणि सर्व शाळांमध्ये सुद्धा योग सूर्यनमस्कार गोष्टी शिकवल्या जातात हे स्वागतार्हच ..कारण आपल्याला अंतर राष्ट्रीय योग गुरू प. पू संगमदेव स्वामीजी यांनी आम्हाला फार वर्षापासूनच या योगाचे महत्व स्वतःच्या कृतीतून आम्हाला स्वीकारायला लावून दिले आहे..नित्य जीवनात स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फक्त एक तास योग करायचा, आणि,निरोगी आयुष्याचा मंत्र जपायचा.देशाला आज ज्या पिढीची गरज आहे ती पिढी या योग,सूर्यनमस्कार, व्यायाम करण्याने आणि या बीज मंत्रानेच मिळू शकते…म्हणुन सर्वांनी नियमित योग ध्यानधारणा सूर्यनमस्कार हे करावे व याचा लाभ करून घ्यावा असे आव्हान परमपूज्य स्वामीजी यांनी या कार्यक्रमानिमित्त केले. यावेळी लहान मुले तरुण वयस्कर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी शिक्षणाधिकारी रेवती हिरेमठ मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच योगाचार्य डी एस कुंभार सर यांनी सर्वांकडून योगा करून घेतला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते
