March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

           कळविण्यात अत्यंत दुःख होते की, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुक्याचे संघटक अनुभवी पत्रकार विनायक साबळे यांचे वडील माणिकराव साबळे यांचा तीन दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा येथे अपघात झाला, रात्री उशिरा एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दु- चाकी गाडीला ठोकर दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी वाघोली येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांचा काल मंगळवार दि 13 रोजी रात्री मृत्यू झाला, त्यांचे पश्चात एक मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे,
त्यांचा दशक्रिया विधी काही अपरिहार्य कारणामुळे उद्या (तिसऱ्या दिवशी) गुरुवार दिनांक 15/12/2022 रोजी बहुळ तालुका खेड, विठोबाचा डोह तेथे सकाळी 8 वाजता होईल, याची सर्व पत्रकार बंधू, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र यांनी नोंद घ्यावी,