March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
     सणसवाडी, कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील नरेश्वर मंदिर परिसरात पुणे नगर रोड ते नरेश्वर मंदिर भोवताली असलेली वनराई पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ही वनराई नरेश्वर मंदिरापासून कोरेगाव भीमा पर्यंत पसरलेली आहे,परंतु नुकताच सुरू झालेला उन्हाळा व पाण्याच्या अभावामुळे ही वनराई आता सुकून,जळून चालली आहे.     

उन्हाचा प्रभाव चालू झाला असून अजून पुढे कडक उन्हाळा लागणार आहे परंतु अगोदरच संपूर्ण वनराई 60 ते 70% सुकलेली असून भविष्यात या कडे दुर्लक्ष केले तर कडक उन्हाच्या प्रभावाने व पुरेसे पाणी न मिळाल्याने संपूर्ण वनराई जळून नष्ट होईल यात तीळ मात्र शंका नाही.

 

  उन्हाळ्यामध्ये  याच वनराई मध्ये आजूबाजूचे ग्रामस्थ सावली मध्ये बसायला तर लहान मुले खेळायला येत असतात बहुतांश फक्त उन्हाळ्यामध्ये या वनराई मध्ये ग्रामस्थ वावरत असल्याचे दिसून येतात परंतु यंदा वनराई सुकून/जळून गेली असल्याने थंडगार सावली पासून समस्थ ग्रामस्थ वंचित राहणार असल्याचे स्पष्ठ होत आहे.वनराई मध्ये काही ठिकाणी लिंबोलीचे वृक्ष आहेत त्यांची पाण्याविना राहण्याची क्षमता जास्त असल्याने फक्त लिंबोळी चेच वृक्ष काही ठिकाणी हिरवे दिसत आहेत परंतु पुढील काळात तेही कडक उन्हाच्या प्रभावाने व पाणी न मिळाल्याने जळून जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना कडक उन्हाळा थंडगार झाडा खाली न घालवता आपल्या घराभोवती असलेल्या छोट्या मोठ्या झाडांखाली व घरातच काढावा लागणार आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे, शिरूर वन खात्याने याकडे वेळेत लक्ष दिले तर अजूनही वेळ गेलेली नाही झाडांना पाणी घातले तर येथील वनराई अजूनही हिरवीगार होऊ शकते, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,