धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळी राज्याचे तत्कालीन सरकार यांच्या वतीने प्रलंबित राहिलेला मुद्दा धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळाचा विकास या मुद्द्यावर राज्यातील भाजप व शिंदे गट या सरकारच्या वतीने आता पावले उचलली गेली असून, समाधी स्थळाच्या विकासासाठी आता नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे, अगोदरच्या निधीमध्ये सुमारे 115 कोटींची वाढ करून 384 कोटीचा सुधारित आराखडा येत्या 15 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर सादर होणार आहे, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव आढळराव पाटील यांच्या या महत्त्वाच्या प्रयत्नाबद्दल वढू बुद्रुक ग्रामस्थ, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, शंभू भक्त यांच्या वतीने आज खासदार आढळराव पाटील यांची भेट घेण्यात आली, त्यांच्या या शंभू भक्तीबद्दल आभार मानण्यात आले, तसेच आगामी पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले, यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती चे संस्थापक – हिंदू योद्धा मिलिंद भाऊ एकबोटे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, बाळासाहेबांची शिवसेना शिरूर तालुका उपप्रमुख हरिभाऊ भंडारे,अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उमेश अण्णा भंडारे,अक्षय भंडारे,महेंद्र भंडारे,अनिल भंडारे,निलेश भंडारे सचिन भंडारे,अरविंद भंडारे आदी उपस्थित होते,

