उपरोक्त विषयी संदर्भिय राजपत्रान्वये मा,भारत निवडणुक आयोगाने मतदान कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा कार्यक्रम दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण देशात राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने भोकरदन तालुक्यातील मतदाराचे मतदान कार्ड आधार कार्ड सोबत जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.
१५ ऑगस्ट २०२२रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत सदरील कार्यक्रमाची नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करावी, तसेच, संदर्भ २ अन्वेय सर्व संबंधित गावच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ग्रामसभेस उपस्थित राहुन मतदारांचे मतदान कार्ड आधार कार्ड्ससोबत जोडण्याची मोहिम राबविण्यात यावी. व गरुडा अँप वर फार्म व भरुन घेण्याची कार्यवाही करावी.
सर्व संबंधित गावच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यानी उपस्थित राहुन सदरील मोहिम यशस्वी राबविण्यात येत असल्याचे फोटो BLO गुपवर पाठवावे. सदरील ग्रामसभेत कोणीही गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.



