March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             थिटेवाडी (केंदूर) येथील हॉटेल व्यावसायिकास किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात हॉटेल व्यावसायिक योगेश जालिंदर खर्डे (वय ३४, रा.थिटेवाडी, केंदुर, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिल्याने
विशाल दगडु पानसरे, हिरामण मारूती थिटे, वैभव विषाल पानसरे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दि.२१ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे थिटेवाडी गावचे हद्दीत फिर्यादी योगेश जालिंदर खर्डे यांच्या मालकीचे ‘हॉटेल शिवमुद्रा’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास विशाल दगडु पानसरे यांच्या मागणीनुसार त्यांना  बिस्लेरीच्या दोन बाटल्या फुकट दिल्या नाही याचा राग मनात धरून त्यांनी हॉटेल व्यावसायिकांस दमदाटी दिली. तसेच ‘तु मला काय ओळखत नाही काय? तु आम्हाला फुकट खायला दयायला पाहिजे. मी थिटेवाडीचा भाई आहे तु जर आम्हाला फुकट खायला दिले नाही तर तुला खल्लास करीन अषी दमदाटी केली.  विशाल दगडु पानसरे, हिरामण मारूती थिटे, वैभव विशाल पानसरे व अन्य दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर आले व  बेकायदा गर्दी जमाव जमवुन फिर्यादीच्या हॉटेलचे आवारात अनाधिकाराने प्रवेष करून यातील विषाल पानसरे यांनी फिर्यादिस  मारहाण करण्यास सुरूवात केली. फिर्यादी खर्डे यांनी प्रतिकार केला असता सर्वांनी मिळून मारहाण केली.शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुतार पुढील तपास करत आहेत.