March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
             तळेगाव ढमढेरे येथे विहिरीत ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळल्याची माहिती शिक्रापूर पोलिस ठाण्यात मयुर प्रकाश यादव (वय २७ वर्षे, रा.माळीमळा, तळेगाव ढमढेरे, ता शिरूर, जि पुणे) यांनी दिली असून मृत महिलेचे नाव संगिता दत्तात्रय बांदल (वय ४५ वर्षे, रा बजाजनगर ,औरंगाबाद जि औरंगाबाद) असे आहे.  

शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मयुर  यादव घरात झोपलो असताना त्यांना घराबाहेर अचानक आरडाओरडा चालल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर जावुन पाहिले असता त्यांच्या घरापासून थोडया अंतरावर विहीरीकडे त्यांना लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी यादव यांनी विहीरीजवळ जावुन पाहिले असता सदर विहीरीत त्यांची मावशी संगिता दत्तात्रय बांदल यांचा मृतदेह विहीरीच्या पाण्यात तरंगत असल्याचे  दिसले. त्यानंतर यादव यांनी तळेगाव ढमढेरे गावचे पोलीस पाटील पांडुरंग नरके यांना फोन करून सदरबाबत माहिती दिल्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेलंग पुढील तपास करत आहेत.