शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे परिसरातील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे विचार समाजामध्ये प्रेरित ठेवण्याच्या हेतूने शिक्षक दिनाच्या निमित्ताने विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना भेटवस्तू आणि मानाचा फेटा बांधून कृतघ्नता व्यक्त करण्यात आली.
यावेळी पीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे, मुख्याध्यापक वाघ सर, मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम, उद्योजक संतोष गवारे, तंटामुक्ती उपाध्यक्ष वैभव गवारे व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते. तसेच तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ प्रशालेमध्ये सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा येथोचीत सन्मान करून त्यांना शालोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास भाजपा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, हर्षवर्धन काळभोर, वैभव गवारे, संजय कामठे, गणेश वडघुले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे व उद्योजक संतोष गवारे यांनी मुख्य भूमिका बजावली.

