March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            टोलच भूत सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसवण्याला सर्व पक्ष,त्यांचे नेते,लोकप्रतिनिधी अन् सरकार जबाबदार आहेत.सामान्य जनता दुचाकी,चारचाकी,ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारचं वाहन खरेदी करताना,त्या वाहनाच रजिस्ट्रेशन करताना रोड टॅक्स वसूल केला जातो,जो कुठलीही खळखळ न करता सामान्य माणूस देत असतो.

                 वाहन खरेदी,पेट्रोल,डिझेल,वाहनाचे स्पेअर पार्ट या सर्वावर भरमसाठ जी एस टी वसूल केला जातो तो वेगळाच. असं असताना या सर्व लोक प्रतिनिधींनी टोल नावाचं झोल च भूत कायम स्वरूपी सामान्य माणसाच्या बोकांडीवर बसवलय.! रस्ते कायम उखडलेले,महामार्ग,रस्ते यांची रुंदीकरण,दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत, अशा अवस्थेत या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास सामान्य माणसे करतायत,परिणामी अपघातांच प्रमाण प्रचंड वाढले आहे.!हजारो निष्पाप जीव रस्ते अपघातात जातायत,लोकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा हकनाक जातोय..! असं असताना वर्षानुवर्षे हे टोलनाके सुरू आहेत.रस्ता बांधकामाला खर्च आला किती ?दुरुस्तीसाठी किती खर्च झाला ?टोलमधून गेल्या कित्येक वर्षापासून किती रक्कम गोळा झाली ?

याचा कुणीही पारदर्शकपणे खरा हिशोब देत नाही,आणि अपवाद वगळता कोणी मागत ही नाही.टोलनाक्यावर गुंडा करवी सामान्य माणसाच्या बखोटी ला धरून,प्रसंगी टोले देऊन टोल वसूल केला जातो,टोल नाक्याच्या आसपासच्या गावातील स्थानिक लोकांकडून ही टोल वसूल केला जातो.गरीब ?मंत्री,लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना मात्र टोलमधून सूट दिली जाते.बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधी हेच टोलनाके त्यांच्या हस्तका मार्फत चालवताना दिसतात. 
सत्तेवर असताना टोलबाबत सोईस्कर मौन बाळगन्याचे धोरण बाळगायचे,कुणी आंदोलन केले तर मोडून काढायचे आणि सत्ता गेली की टोलविरोधी आंदोलन करायचे असा सर्व पक्ष आणि राजकारणी यांचा खेळ सुरू आहे.
देश अथवा राज्याच्या तिजोरीत जाणारा पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट मार्गाने लोकप्रतिनिधी,मंत्री,प्रशासकीय अधिकारी,ठेकेदार,कंत्राटदार,दलाल यांच्या खिशात जाऊन या लोकांचे उखळ पांढरे झाल्याने,सरकारी तिजोऱ्या मोकळ्या झाल्या,देश राज्यांवर,पर्यायाने सामान्य माणसावर लाखो कोटींचा कर्जाचा बोजा झाला.संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरल्याने टोलबरोबरच महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशी अनेक प्रकारची भुते सामान्य माणसाच्या कायमची बोकांडीवर बसवली गेली आहेत.
ही सर्व भुते कायमची बाटलीबंद करण्यासाठी आता खऱ्या अर्थाने आंदोलन आणि संघर्ष उभारला गेला पाहिजे.